Share

विमान दुर्घटना: १९ जण दगावले तर अनेकांवर उपचार सुरु

Published On: 

🕒 1 min read

कोझिकोड: काल संध्याकाळी ७:४५ च्या सुमारास कोझीकोड येथील विमानतळावर लँडिंग करताना एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून १७० जणांना वाचवण्यात यश आले आहे. यात, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मल्लपुरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचा काल कोझिकोड विमानतळावर लँडिंग करताना अपघात झाला. या विमानात १८९ प्रवासी आणि ६ क्रू-मेंबर्स होते, तर प्रवाशांमध्ये १० लहान मुलांचा देखील समावेश होता. या अपघातानंतर विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या विमानाने दुबईहून उड्डाण घेतलं होत, तर ७:४५ च्या सुमारास लँडिंग करताना रनवेवरून घसरत जात या विमानाचा अपघात झाला आहे.

गणेशोत्सव: कोकणासाठी मनसेच्या उपक्रमातून बसेस रवाना!

या विमानाचे वैमानिक हे महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन दिपक साठे होते. मात्र, या सर्व प्रवाशांचा जीव वाचवताना या विमान अपघातात त्यांना आपला प्राण गमवावा लागला. वंदे भारत मिशन अंतर्गत हे विमान दुबईतील भारतीय नागरिकांना घेऊन केरळला परतत होते. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे अशा धावपट्टीवर विमान उतरवताना फार काळजी घ्यावी लागते. यातच काल (शुक्रवारी) पावसामुळे रनवेवर पाणी साचलं होतं आणि पावसाचा जोर वाढल्याने दृश्यता देखील कमी झाली होती.

भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा;सामान्य माणसाच्या पैशावर मारला डल्ला

या विमान अपघातानंतर, देशभरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. अधिकारी घटनास्थळी आहेत, जखमींना सर्व मदत मिळत आहे, असे ट्विट केले होते.

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!