नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या आईचे शनिवारी निधन झाले. ही माहिती स्वतः रेल्वेमंत्र्यांनी एका ट्वीटद्वारे दिली आहे. ‘माझ्या प्रेमळ आईने, ज्यांनी मला नेहमीच त्यांच्या प्रेमाने मला मार्ग दाखविला, त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवेत घालवले आणि सेवेसह जगण्यासाठी आम्हाला प्रेरित केले. अशा भावना पियुष गोयल यांनी व्यक्त केल्या आहेत.
चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या माटुंगा मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या देखील होत्या. त्या 3 वेळा आमदार म्हणून निवडणून आल्या होत्या.
अपने स्नेह, और प्रेम से मुझे हमेशा राह दिखाने वाली मेरी पूज्य माता जी का आज सुबह स्वर्गवास हो गया।
उन्होंने अपना पूरा जीवन सेवा करते हुए बिताया, और हमें भी सेवाभाव से जीवन बिताने को प्रेरित किया। ईश्वर उन्हें अपने श्री चरणों मे स्थान दें। ॐ शांतिः pic.twitter.com/mwlIks6TBJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 6, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

