Share

पनवेल : उसर्लीगाव येथील मोरया गार्डन रेसिडन्सी परिसर कंटेटमेंट झोन म्हणून घोषित

Published On: 

🕒 1 min read

विवेक पोटफोडे| अलिबाग : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसर्लीगाव येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आला आहे. त्यामुळे उसर्लीगाव येथील मोरया गार्डन रेसिडन्सी परिसर Containment Zone म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या मोरया गार्डन रेसिडन्सी, 2 एच-102, गावदेवी मंदिराच्या बाजूला, उसर्लीगाव, ता.पनवेल व त्यापासून पूर्वेस/सदिच्छा को.ऑ.हौ.सो.पश्चिमेस प्रयाग गार्डन/गंगा विहार को.ऑ.हौ.सो., उत्तरेस विचुंबेकडे जाणारा रस्ता व दक्षिणेस एनपी निसर्ग सोसायटी हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!