Share

T20 World Cup | पाकिस्तान संघ कराची विमानतळावर प्रवेश करण्यास पात्र, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न : टी20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यांमध्ये काल रविवारी रात्री भारताचा (India) पहिला पराभव झाला. त्याचबरोबर पाकिस्तान (Pakisthan) संघाची वर्ल्ड कप मध्ये राहण्याची शेवटची आशा संपुष्टात आली. पाकिस्तानला या विश्वचषक सामन्यांमध्ये टिकून राहण्यासाठी सर्व उर्वरित सामने जिंकणे महत्त्वाचे होते, तर त्याचबरोबर इतर संघाच्या विजय-पराजयावर अवलंबून राहायचे होते. अशा परिस्थितीत काल भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यामुळे पाकिस्तानची ही आशा आता संपुष्टात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तान टीमचे चाहते  त्यांच्या चुकीच्या कामगिरीमुळे संतप्त झाल्याचे दिसले आहे. कारण पाकिस्तान टीम कडून मॅच दरम्यान चुकीचे निर्णय आणि चुकीच्या फील्डिंगमुळे  त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला आहे. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी अनेक चुका केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंकडून टीमवर टीका केल्या गेल्या आहेत. तर सोशल मीडियावर पाकिस्तान टीम मधील अनेक खेळाडूंचे मीन्स व्हायरल होत आहे.

टी-20 विश्वचषक T20 World Cup सामन्यांमध्ये पाकिस्तानची सद्यस्थिती

पाकिस्तान संघाने नेदरलँड चा 37 चेंडूत 7 गडी राखून पराभव केला. आता पाकिस्तान संघाला ग्रुप-2 च्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या देशांशी सामना करायचा आहे. इथून पाकिस्तान या दोन्ही सामन्यांमध्ये जिंकला तरी पाकिस्तानचे टोटल 6 पॉइंट्स होतील. परंतु नेट रन रेटच्या लढाईत पाकिस्तान इतर संघाच्या तुलनेत मागे पडण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान संघ सध्या पॉईंट्स टेबलवर तळापासून दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

काल झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारताला सपोर्ट केल्याचे दिसले आहे. कारण काल टीम इंडिया जिंकली असती तर पाकिस्तान टीमला सेमी फायनल मध्ये जाण्याचा रस्ता स्पष्ट झाला असता. परंतु, आता भारताच्या पराभवानंतर पाकिस्तान टीम यशस्वीरित्या कराची विमानतळावर जाण्यास पात्र झाली आहे. पाकिस्तान टीमने उरलेल्या सगळ्या मॅच जिंकल्या तरी सुद्धा पाकिस्तान टीम सेमी फायनल मध्ये पोहोचू शकत नाही अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तान खेळाडूंच्या नावाने सोशल मीडियावर अनेक मीन्स व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ishantraj51/status/1586747125177937921?s=20&t=cS-CLHUCl3dNHbchuHHajg

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!