Share

बॅडमिंटन: अशी कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

काल भारताच्या पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीमध्ये रौप्यपदकाची कामगिरी केली. याबरोबर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ३ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.

याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकून साइना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत २ पदके जिंकली. यात २०१५ साली रौप्यपदक तर २०१७ साली कांस्यपदक जिंकले आहे.

भारतीय खेळाडूंनी यापूर्वी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगीरी केली आहे. भारताच्या नावावर १९८३ सालापासून ते २०१६ पर्यंत ७ पदके आहेत.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडे आता पुरुष एकेरीमध्ये एक, महिला दुहेरीमध्ये एक आणि महिला एकेरीमध्ये चार अशी एकूण सात पदके आहेत.

भारताची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरी:

पीव्ही सिंधू (२०१३ – कांस्यपदक, २०१४ – कांस्यपदक, २०१७ – रौप्यपदक)

साइना नेहवाल (२०१५ – रौप्यपदक, २०१७ – कांस्यपदक)

अश्विनी पोनप्पा- ज्वाला गुट्टा (२०११ – कांस्यपदक)

प्रकाश पदुकोण (१९८३ – कांस्यपदक)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!