Share

‘मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर, जाणून घ्या काय आता नेमकी काय असणार बंधने

Published On: 

पुणे :  कोविड – 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केली असून, त्यास 31 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर केली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.

कचरा घोटाळ्याच्या तक्रारीची चौफेर चौकशी करा; महापौरांचे तुकाराम मुंढेंना निर्देश

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नूसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली असून त्याबाबत नियमावली प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

दि. 31 जुलै 2020 पर्यंत शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात हा आदेश दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2020 पर्यंत लागू राहील आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. तसेच पुणे महानगरपालिका क्षेत्र :- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतीना परवानगी राहील, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

पुणे व खडकी छावणी परिषद :- पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम कृतींना परवानगी राहील, देहूरोड छावणी परिषद :- देहूरोड छावणी परिषद क्षेत्र पिपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहुरोड छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

वरीलप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत शासनाकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील.

नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा, ४० इलेक्ट्रिक बस होणार परिवहन सेवेत रूजू

या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय साथ अधिनियम 1987, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!