उस्मानाबाद : तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील शेकडो फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे मंदिर संस्थानने तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विनापरवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरणास मनाई केली आहे. यासंदर्भातील निर्देश सुरक्षा कंपनी बीव्हीजीला दिले आहेत.
मंदिरातील फोटो तसेच चित्रीकरणाचा दुरुपयोग होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने मंदिरातील सुरक्षा कंपनी बीव्हीजीला पत्र दिले आहे. या पत्राद्वारे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात विनापरवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास मनाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तशा आशयाची नोटीस तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात डकवण्यात आली आहे.
तुळजाभवानी मातेचे फोटो मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावरून घ्यावेत. मंदिरात फोटो काढायचे असतील किंवा चित्रीकरण करायचे असेल तर मंदिर संस्थानची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना पूर्वीपासून बंदी आहे. मात्र तरीही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यातील फोटो, चित्रीकरण व्हायरल होतातच कसे, यावर प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नुकसान भरपाई देण्यास नकार, पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव
- ‘मराठा समाजाला मराठवाड्यात ओबीसीतून आरक्षण द्यावे’, प्रा.प्रदिप सोळंकेंची मागणी
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- ‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू, राहुल गांधींचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

