मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी
आता संजय राऊत यांच्या या निष्कर्षावर भाजप नेते निलेश राणे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘अरे रे रे किती नीचपणा म्हणावा ह्या संज्याचा…. स्वतःला जमत नाही म्हणून वाट्टेल ते कोण स्वखर्चातून करतोय त्याच्यावर आरोप करायचे. संज्या तू तुझ एक कार्य सांग ह्या ३ महिन्यात स्वतःच्या पैश्याने केलेलं??? एकतर तू तुझे संध्याकाळचे टेबलावरचे विषय रोज सामन्यात छापून आणतो’. अस म्हणत राणेंनी संजय राऊत यांना फैलावर घेतल आहे.
अरे रे रे किती नीचपणा म्हणावा ह्या संज्याचा…. स्वतःला जमत नाही म्हणून वाट्टेल ते कोण स्वखर्चातून करतोय त्याच्यावर आरोप करायचे. संज्या तू तुझ एक कार्य सांग ह्या ३ महिन्यात स्वतःच्या पैश्याने केलेलं??? एकतर तू तुझे संध्याकाळचे टेबलावरचे विषय रोज सामन्यात छापून आणतो. https://t.co/HHCwjdwMOc
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2020
त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सुद्धा संजय राऊत यांना फटकारलं आहे. ‘पहिले जे शिवसैनिक करायचे तेच सोनू आता करतो आहे. पहिले बाळासाहेब होते. आता उद्धव ठाकरे आहेत. वक्त वक्त कि बात है’ !! अस म्हणत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
पहिले जे शिवसैनिक करायचे..
तेच सोनू आता करतो आहे..पहिले बाळासाहेब होते..
आता उद्धव ठाकरे आहेत..वक्त वक्त कि बात है !!
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 7, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

