Share

पंतप्रधान तर लांबच आधी मुंबईत पुढचा महापौर बसवून दाखवा – नितेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथे शिवसेने च्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

महाराज खासदार झाले ! ज्योतिरादित्य सिंधियांचा दणदणीत विजय

उद्धव ठाकरेंच्या याच निर्धाराचा आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पंतप्रधानपद लांबच राहिले. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर स्वत:चा महापौर तरी बसवून दाखवावा, असे आव्हानच नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून नितेश राणे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, द्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

छत्रपतींच्या राजधानीत गलथानपणा सहन होणार नाही, ‘त्या’ कॉन्ट्रॅक्टर चे काँन्ट्रँक्टच रद्द !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!