मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेत नवनियुक्त सदस्य शपथ घेत असतानाच छत्रपतींच्याच वंशजांनी ‘ जय भवानी, जय शिवाजी’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली ते गल्ली राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला.
व्यंकय्या नायडु यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही असं भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समज दिली असल्याचं म्हटलं. महाराजांचा अपमान झालाच नाही तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नसल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं.
छत्रपती उदयनराजे यांच्या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी या घोषणेला आक्षेप विरोधी बाकावरून घेतला. आक्षेप घेणारे गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आहेत हे समजल्यावर काही जणांनी पोस्ट डिलीट केल्या. pic.twitter.com/9zMoLuzOig
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 23, 2020
या सर्व प्रकारावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की उदयनराजे यांच्या घोषणेवर विरोधी बाकावरून आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेणारे मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलामनबी आझाद आहेत, हे समजल्यावर काही जणांनी पोस्ट डिलिट केल्या.
त्याच सभागृहात शरद पवार साहेब पण होते त्यांनी तेव्हाच उठून का नाही घेतला आक्षेप. व्हिडिओ नीट बघा विरोधाचा आवाज काँग्रेसच्या दिशेने आला आणि त्यावर ruling दिली… पवार साहेब शांत का बसले ??? https://t.co/jsbsqqBOtd
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 23, 2020
याशिवाय त्यांनी शरद पवारांनाही प्रश्न विचारले आहेत. ‘त्याच सभागृहात शरद पवार साहेब पण होते. त्यांनी तेव्हाच उठून आक्षेप का नाही घेतला. व्हिडिओ नीट बघा. विरोधाचा आवाज काँग्रेसच्या दिशेने आला. त्यानंतर सूचना दिली. पवारसाहेब शांत का बसले,’असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धावून आला सोनू सूद; खास विमानाची केली सोय
रिलायन्स साठी घाईघाई , दूरदर्शनसाठी दिरंगाई मागची गोम काय ?
कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

