टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेट विश्वात रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने सोनाली बेंद्रेच्या बाबतीत धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या मी प्रेमात पडलो होतो आणि तिने जर मला नकार दिला असता तर तिचं अपहरण करणार होतो असे शोएब अख्तरने एका मुलाखतीत सांगितले आहे.
यावेळी मुलाखतीत म्हणाला की, भारत दौऱ्यावर असताना त्याची ओळख अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी झाली आणि त्याचक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. एवढंच नाही तर सोनालीचा इंग्लिश बाबू देसी मेम हा सिनेमा पाहिल्यानंतर मी सोनालीचा फार मोठा चाहता झालो. बरेच दिवस सोनालीचा फोटो माझ्या पाकिटात असायचा. माझ्या खोलीत सोनालीचे पोस्टरही असायचे. तसेच अख्तर पुढे म्हणाला की, जर सोनालीने माझ्या मागणीला नकार दिला असता तर मी तिचं अपहरण करणार होतो.
याबाबत सोनालीला विचारले असता तिने शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं. सोनाली म्हणाली होती की, तिला क्रिकेटमध्ये फारसं स्वारस्य नसल्यामुळे तिला कोणत्याच खेळाडूचं नाव माहीत नसतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

