Share

इंद्रायणी एक्सप्रेस ५ मार्चपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार

Published On: 

सोलापूर- इंद्रायणी (इंटरसिटी) 5 मार्च पासून सुरू करणार असल्याची माहिती मंडल रेल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी सांगितली. 125 दिवसांच्या विश्रांतीनंतर इंद्रायणी पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर-पुणे या स्थानकादरम्यान धावणार आहे.तसेच पुणेहून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर स्थानकाकडे रवाना होईल.

या गाड्यांमुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना लाभ घेता येईल.रेल्वे प्रशासनाने वाशिंबे ते जेऊर दरम्यान ट्रॅकच्या कामामुळे 1 नोव्हेंबर 2017 पासून दररोज 1 तास 45 मिनीटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणा-या प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणा-या हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंद केले आहे. दुपारच्या सत्रात असणा-या नागरकोईल व उद्यान एक्सप्रेसने अनेकांनी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु आरक्षण केलेली तिकिटे कन्फर्म होत नाहीत. रेल्वे प्रशानाकडून हुतात्मा एक्स्प्रेसला अधिक कोच जोडून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!