Share

तर मेट्रोची चाचणी होऊ देणार नाही, मेट्रो अधिकाऱ्यांना महापौर उषा ढोरेंनी दिला इशारा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच सोमवारी (ता. 30) नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस पिंपरीत दाखल झाले. प्राथमिक चाचणीसाठी पुणे मेट्रोचे डबे सज्ज झाले अहेत. मात्र मेट्रो डब्यांच्या पुजनावेळी मेट्रो अधिकारी आणि उषा ढोरे यांच्यामध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळाले. या मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे मात्र नाराज झाल्या आहेत.

पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानचे मेट्रो रुळांचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीतील संत तुकारामनगर स्टेशन येथे मेट्रोचे तीन डबे क्रेनद्वारे रुळावर आणण्यात आले.त्यावेळी कोचेसवरील कागद न हटवता ढोरे यांना पूजन करायला सांगितले. मात्र, याबाबत महापौरांना कोणतीच कल्पना नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. याच बरोबर मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेखही नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मेट्रो अधिकाऱ्यांशी विचारपूस करूनही समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने मेट्रोची चाचणीच होऊ देणार नाही, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला आहे.

तर मेट्रो जरी रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आली असली तरी  तूर्तास प्रत्यक्षात  ती धावणार नाही. पुढील महिनाभर तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक चाचणी घेतली जाणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान 27 डिसेंबर रोजी पुणेमेट्रो कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात अनावरण करण्यात आले. मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून एका गाडीतून 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव. तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!