Share

पुण्यात जोरदार पाऊस; तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Published On: 

पुणे : राज्यातील अनेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग केली. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. उद्या देखील विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पडेल. तसेच राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासात कोकणातील वेंगुर्ला १००, लांजा ६०, अलिबाग, देवगड, कणकवली, मालवण, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी ५०, मुंबई (सांताक्रुझ), रामेश्वरी ४०, दोडामार्ग, कुडाळ, मुरुड, केपे, राजापूर, तळा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मध्य महाराष्ट्रातील इंदापूर ९०, मेढा ८०, अमळनेर, चोपडा, माळशिरस ६०, गगनबावडा ५०, दहिवडी माण, नांदगाव, पंढरपूर ४०, बार्शी, मालेगाव, मंगलवेढा, पारोळा, फलटण ३० मिमी पाऊस झाला होता. आणि मराठवाड्यातील गंगापूर ९०, कन्नड ५०, देवणी हदगाव, फुलंब्री, रेणापूर, सिल्लोड ४०, अंबेजोगाई, आष्टी, बीड, भोकरदन, चाकूर, गेवराई, पाटोदा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच विदभार्तील लोणार, मालेगाव, सिंधखेड राजा ३०, आमगाव, देऊळगाव राजा, दिग्रस, गोरेगाव, लाखंदूर, मंगळुरपीर, मानोरा, नांदगाव काजी, पातूर, रिसोड, साकोली, सावनेर २० मिमी पाऊस झाला होता.

या ठिकाणी दिला अतिवृष्टी इशारा :
२ व ३ जुलै रोजी रायगड, रत्नगिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. पालघर, मुंबई, ठाणे, धुळे, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ३ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून ३ जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!