पुणे: गेली पाच दशकांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात अग्रभागी असणारे नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार. बारामतीचे आमदार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते थेट केंद्रातील कृषीमंत्रीपद शरद पवार यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. राजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय जगतावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.
शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे. रोहित पवार यांचा समाजकारणासह राजकारणातील प्रवास उलगडणारी ‘महाराष्ट्र देशा’ने घेतलेली हि खास मुलाखत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

