Share

रेड झोनमध्ये येण्यास व जाण्यास पास दिला जाणार नाही 

Published On: 

नाशिक : जिल्ह्यातील सहा तालुक्यांसह नाशिक महापालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोमेंट तसेच येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, निफाड ही सात क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने या परिसरातील नागरिकांना येण्यास व जाण्यास कोणत्याही प्रकारचा पास मिळणार नाही. तसेच या परिसरातील नागरीकांनी पाससाठी आवश्यक आरोग्य तपासणीकरिता देखील गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील नाशिक महापालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोमेंट, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, निफाड हे तालुके रेड झोनमध्ये आहेत.

त्यामुळे येथील नागरिकांना या क्षेत्रातून बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही, असे मांढरे यांनी कळविले आहे. कोणीही परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयांत गर्दी करू नये.

तसेच परवानगी मिळविण्यासाठी दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी देखील गर्दी करू नये. या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालक्यांतील नागरिकांनी पास मिळविण्यासाठी nashikepass.in/या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.

हेही पहा –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!