Share

बांधावर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक-‘महात्मा फुले कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला 870 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असुन,हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनीदिले.

नाशिक जिल्हा परिषदेत कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कृषी व कोरोना साथरोग व इतर विभाग आढावा काल झलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, आमदार दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती सयाजीराव गायकवाड, समाजकल्याण समिती सभापती सुशिला मेंगाळ, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, कृषी व पशुसंर्वधन सभापती संजय बनकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव
पडवळ, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. यु. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उज्वला बावके, व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, खरीप पीक हंगामासाठी सध्या पोषक वातावरण असुन शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व शेती अवाजारे खरेदीसाठी वित्तीय उपलब्धीची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आठवडाभरात निधी उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्ज व इतर
कर्ज खात्यावर परस्पर जमा न करता त्यांना थेट त्याचा लाभ देण्यात यावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पीककर्जाचा पुरवठा वेळेत झाल्यास जिल्ह्यातील बँकांची कामगिरी व विश्वासार्हता यातुन निदर्शनास येईल, यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई
केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

सदर बैठकीत आरोग्य विभागाचा आढावा घेतांना श्री. भुसे यांनी सांगितले की ज्या तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. तेथे स्वतंत्र आरोग्य यंत्रणा न राबता सदर रूग्णांना लगतचा तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्तलांतरीत करावे, जणेकरून ही आरोग्य यंत्रणा इतर ठिकाणी सेवा देवू शकतील. तसेच
ग्रामपंचायतींच्या समन्वयाने गावपातळीवर कोरोना रूग्ण तपासणीसाठी कॅम्पसचे आयोजन करण्यात यावेत. कोरोना झालेल्या रूग्णांची मानसिकता खचते, अशा वेळी रुग्णांना सकारात्मक मानसिक बळ देवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रूग्णांसाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलबध करून द्याव्या अशा
सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या. यावेळी मंत्री भुसे यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांना सध्या मेंढीवर आढळणाऱ्या लंगड्या आजाराची माहिती घेवून या रोगाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना राबविण्यास पशुसंवर्धन विभागास सांगितले आहे.

जिल्ह्यातील 2300 शाळांमध्ये ऑनलाईनशिक्षण सुरू आहे. ज्या आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणप्रणाली प्रभावीपणे पोहचू शकत नाही. त्या ठीकाणी शिक्षकांनी स्वत: जाऊन विविध उपाययोजनेद्वारे कसे शिक्षण देता येईल, याचा प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागात ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलची व्यवस्था नाही, अशा
विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी ‘शिक्षक मित्र गल्ली मित्र’ संकल्पना राबविण्यात यावे असेही  भुसे यांनी सांगितले.

बांधवर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल
जिल्ह्यात जून महिन्यात 233.10 मि.मी तर 1 जुलै ते 13 जुलै 2020 पर्यंत 75.80 मि.मी प्रत्यक्ष पर्जन्यमान झाल्याचे सांगितले. आज रोजीपर्यंत जिल्ह्यात खरीप हंगाम अंतर्गत 4 लाख 9 हजार 36 पुर्णांक 43 हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष पेरणीखाली असून, एकूण 73.63 टक्के पेरणी झाली आहे. यात भात, नागली व वरई या पीकांची
पुनर्लागवड सुरू आहे. बाजरी, सोयाबीन व मका पीक सुध्दा उगवण व वाढीच्या आवस्थेत आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात लष्करी अळीचा प्रार्दूभाव दिसून आला आहे. तुर, मुग, उडिद, भुईमुग, कापूस वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच खरीप कांदा हा जिल्हाच्या पूर्व भागत लागवडीखाली आहे. जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्रासाठी
97 हजार 694 क्विंटल बियाणे मागणी पैकी प्रत्यक्ष पुरवठा 97 हजार 102 क्विंटल इतका झाला आहे. रासायनिक खतांचे आवंटन 2.11 लाख मे.टन आहे यापैकी आजपर्यंत 1 लाख 9 हजार 543 मे.टन खत पुरवठा करण्यात आला आहे.

राज्यात बांधवर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. यामध्ये कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर बांधावर बियाणे व खत पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात आजपर्यंत 7610 गटांमार्फत 48 हजार 213 पुर्णांक 56 मे. टन खते व 35 हजार 548 पुर्णांक 90 क्विंटल बियाणांचा पुरवठा
बांधावर करण्यात आला आहे. पिकांच्या गुणवत्ता नियंत्रणसाठी जिल्ह्यात 44 गूण नियंत्रण निरिक्षक, प्रत्येक तालुक्यात एक आणि जिल्हास्तरीय एक अशी 16 भरारी पथके व जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापना करण्यात आले असून शेंदरी बोंडअळी, मक्यावरील नवीन लष्करी अळी व कीटकनाशके फवारणी
याबाबत जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी मंत्री भुसे यांनी दिल्या.

जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकरी शेतीशाळा अंतर्गत एकूण 528 शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले असून यात 25 टक्के महिलांनी सहभाग घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजना 2019-20 अंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1 लाख 98 हजार 512 शेतकरी सहभागी झाले होते. यातून 1 लाख 88 हजार 772 शेतकऱ्यांना
पिक विमा योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. असेपडवळ यांनी अहवाल सादरीकरणात सांगितले. तसेच यावेळी प्रभारी कृषी अधिकारी, माधुरी गायकवाड यांनी सुद्धा यावेळी जिल्हा परिषद, कृषी विभाग आढावा सादर केला.

सदर बैठकीत  भुसे म्हणाले की, मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रार्दूभाव व मुग पीक किड रोखण्यासाठी प्रभावी उपायायोजना करुन, शेतकरी बांधवांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करावे तसेच ज्या ठिकाणी बियाणांच्या तक्ररी आल्या आहेत तेथे तात्काळ सदोषबियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. निफाड
तालुक्यात काही ठिकाणी डाळींब पिकावर तेलकट डाग दिसून येत आहेत. त्यावर सुद्धा उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हा पातळीवर खत व बियाणे पुरवठादारांच्या परवाने नुतनीरकण पेंन्डसीबाबत माहिती घेवुन त्याचा अहवाल सादर करावा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना लवकरच कार्यान्वीत होणार असून, शेतकऱ्यांना पाठबळ देऊन चिंतामुक्त व सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी पीक विमा संदर्भात
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विमा ऐच्छीक स्वरूपाचा करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचे लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या ‘सिंगल पेज ॲप्लीकेशन’ याद्वारे ऑनलाइन घेता येणार असून सर्व प्रकराच्या योजनांसाठी एकच अर्ज असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!