Share

मुनगंटीवार, शेलार यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात संधी, हीना गावितांवरही सोपविली महत्वाची जबाबदारी

Published On: 

नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले.जेपी नड्डा यांनी भाजपची 80 जणांची जम्बो टीम आज जाहीर केली. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्षांपासून ते राज्य प्रभारींचाही समावेश आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे.

या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.  या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.

नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश,प्रभारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!