पुणे : राज्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या सत्तापालटानंतर राजकीय विषय बाजूला राहून देशावर, जगावर कोरोनाचं संकट उभं ठाकलं. कोरोना सारख्या महामारीच्या काळात महाराष्ट्र सरकारने जबाबदारी पार पाडली. मात्र विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी महाविकास आघाडीवर सडकून केली आहे.
गेल्या दोन वर्षातील जनतेच्या अपेक्षांची यादी मोठी आहे.घरकामगार,रिक्षा चालक असो किंवा विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा असंघटीत क्षेत्रातील कामगार,लघु उद्योजक या सर्वांच्या वाट्याला अत्यंत कठीण काळ आला आहे.अजूनही आर्थिक चक्र व्यवस्थित सुरु झाले नाही.अशावेळी लोकसंख्येच्या आर्थिक स्थरातील खालच्या गटाला आर्थिक मदत देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे अभूतपूर्व संकट आल्यापासून जनता पूर्ण पिचून निघाली आहे. त्यातच अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे. समजूतदार कुटुंब प्रमुखाची भाषा बोलत जनतेला सहन करण्याचे आवाहन करणारे मुख्यमंत्री आणि तिघाडी सरकारने जनतेचे रोजगार,कोरोना उपचार,शैक्षणिक शुल्काचा तगादा, वीजबिल सवलत, महागाई, गृहखात्याचे अपयश,महिला अत्याचार या सर्वच आघाडीवर निष्क्रिय ठरले असल्याने जनतेसाठी महाविकास आघाडी महात्रासाची ठरली आहे, अशी टीका मुकुंद किर्दत म्हणाले आहेत.
राज्यातील ३५ लाख घर कामगार महिलांपैकी एक लाख महिलांनादेखील दीड हजार रुपयांची किरकोळ मदतही मिळू शकली नाही.इतर सर्व राज्यात खासगी शाळांनी शुल्क सवलत दिली.पण महाराष्ट्रात मात्र पालकांची सरकारने अक्षरश: चेष्टा केली. वीजबिल सवलतीबाबतचे ‘यु टर्न’ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले.पेट्रोल,डिझल,गॅस भाववाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवीमुळे जनतेला या जुगलबंदी वर हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे, अशीही टीका मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंदोलन मागे घ्यायचं की चालू ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा’
- आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरतं मागं घेतोय- सदाभाऊ खोत
- गोव्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा झटका
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी
- नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत कोहलीची विशेष तयारी


