लातूर/ सिंधुदुर्ग : केंद्र सरकारने कृत्रीम महागाई निर्माण केली आहे, असा आरोप करत काँग्रेसने भाजपा विरोधात जनआंदोलन छेडले आहे. ‘बहुत हुई महंगाई की मार’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. सर्वच जिवानावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत, आता हाच मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून भाजपाविरोधात जनआंदोलन छेडण्यात आले आहे. आज रायगड, लातूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महागाई विरोधात काँग्रेसने मोर्चा काढला आहे.
मोदी सरकारनिर्मीत कृत्रीम महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने #जन_जागरण_अभियान राबवण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्री. बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. pic.twitter.com/iQw6zEaH7M
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 14, 2021
याबाबत काँग्रेसच्या राज्य ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. मोदी सरकारनिर्मीत कृत्रीम महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जन जागरण अभियान राबवण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. तर लातूर शहरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. अशी माहिती काँग्रेसच्या राज्य ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
मोदी सरकारनिर्मीत कृत्रीम महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने #जन_जागरण_अभियान राबवण्यात येत असून लातूर शहरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आर सी घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. pic.twitter.com/hP03ZayQBh
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 14, 2021
याबाबत काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत माहिती दिली होती. ‘बहुत हुई महंगाई की मार नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाई नव्या उच्चांकावर पोहचली आहे. इंधनापासून ते अन्नधान्य सारंच महागलं आहे. याच महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने #जन_जागरण_अभियान हाती घेतले असून आपणही त्यात नक्की सहभागी व्हा, असे अवाहन अशोक चव्हाणांनी केले आहे.

