टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याकडून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी 51 रिक्षांची मोफत सेवा देण्यात आली. ही मोफत सेवा केवळ ठाणे शहरात राबविण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५१ व वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवस निमित्त अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम घेतले, परंतु ठाण्यातील महेश कदम यांनी एक आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवला आहे.
राज ठाकरे यांच्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त ५१ रिक्षांची मोफत सेवा दिली आहे. रिक्षाला हात दाखवा आणि इच्छित स्थळी मोफत जा असा हा उपक्रम होता. ठाणे महापालिका मुख्यालयापासुन या मोफत रिक्षा सेवांना सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे, जो रिक्षाचालक प्रवाशांना चांगली सेवा देतील त्यांना विशेष बक्षीस देखील देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


