Share

आमदार महेश लांडगे यांना दवाखान्यातून डिस्चार्ज

Published On: 

पुणे : भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्या २९ जूनला निष्पन्न झाल होत. अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणा-या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते.

मात्र आता आमदार महेश लांडगे यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून परिवारासह डिस्चार्ज देण्यात आला आहे. लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जूनला निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चालली, हे वरिष्ठ नेते चांगलं जाणून आहेत; शिवसेना नेत्याची उघड नाराजी

माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रीटमेंट सुरु राहिल, असे ट्वीट करत लांडगे यांनी आपल्या डिस्चार्जची माहिती दिली आहे.

https://twitter.com/maheshklandge/status/1279656558633385984?s=20

दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांचे कोरोनामुळे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर 25 जूनपासून उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीत आढळले होते.

घाबरून न जाता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा; धनंजय मुंडेंचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!