Share

चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा चमत्कारिक कारभार, शेलारांची सामंत यांच्यावर खोचक टीका

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाल्याने सर्व प्रकारचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. यातच एप्रिल, मे हा विविध परीक्षांचा असणारा कालावधी देखील कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडल्याने सर्व प्रकारच्या परीक्षा महाराष्ट्रात देखील तत्काळ पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

अंबाजोगाईत प्लाझमा थेरेपी यंत्रणा सज्ज ! धनंजय मुंडेंच्या मागणीला यश

८ मे रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्ष सोडून सर्व वर्षांच्या परीक्षा या रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर एटिकेटी व बॅकलॉग परीक्षांचे काय होणार यावरून संभ्रम अजून देखील कायम आहे.

एटिकेटी व बॅकलॉग असणारे अनेक विद्यार्थी असून, जर योग्य निर्णय झाला नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होऊ शकते. उदय सामंत यांनी एटिकेटी व बॅकलॉग साठी विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल अशी वारंवार भूमिका स्पष्ट केली असली तरी अजून अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. यासाठी आशिष शेलार यांनी वारंवार लक्ष वेधण्यासाठी ट्विटरद्वारे सरकारच्या निर्णयावर व उदय सामंत यांच्यावर टीका सत्र सुरु ठेवले आहे.

समाजाची दिशाभूल करून ‘सारथी’ बंदच करून टाकणार का, खा संभाजीराजे संतापले

आज आशिष शेलार यांनी ट्विट करत, ‘परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय काढून १५ दिवस होऊन देखील एटिकेटी व बॅकलॉग चा निर्णय घेण्यात आला नसून मंत्रांनी बैठक देखील घेतली नसल्याचे म्हणत चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा चमत्कारिक कारभार, या शब्दात टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!