Share

माऊली, तुकोबांच्या पालखींचे पुण्यनगरीत दोन दिवस मुक्काम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांनी श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीच्या दिशेने वारकऱ्यांची पाऊले पुढे चालली आहेत. माऊली आणि तुकोबांची पालखी सध्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असून उद्या, शुक्रवारी सासवडच्या दिशेने प्रस्थान करत पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. यंदा१२ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कोपऱ्यातून वारकऱ्यांंनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताई यांच्या पालख्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. अवघ्या वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यातील जून निवडुंग्या विठोबा या ठिकाणी मुक्कामी आहे. संगम वाडी पुलावर दोन्ही पालख्या काल एकत्र आल्या होत्या. उद्या सासवडच्या दिशेने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. दरम्यान, पालखीवेळी पाऊस हवा तेवढा पडत नसल्यामुळे वारकरी विठूरायाला पाऊस पाडण्याची विनंती या वेळी करत आहे.

जवळपास २५० किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात आहेत. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!