Share

पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरला धु धु धुवा, मास्टर ब्लास्टरचा टीम इंडियाला सल्ला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी आणि रोमांचक असा भारत वि. पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर मैदानावर हा महामुकाबला होणार आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत सहावेळा भारत – पाकिस्तान संघ समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. यंदाच्या सामन्यातही त्याचीचं पुनरावृत्ती होईल असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. तर उद्या होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचा हुकमी एक्का मानला जाणारा फास्ट बॉलर मोहम्मद अमीर हा भारतासाठी हा घातक ठरू शकतो, त्यामुळे त्याच्यापासून सतर्क राहा, मात्र त्याच्या गोलंदाजीवर आक्रमकपणे प्रहार करा असा सल्ला सचिनने भारतीय संघाला दिला आहे. खासकरून कर्णधार विराट कोहली याला हा सल्ला दिला आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन भारताचे अनुभवी खेळाडू आहेत. पाकिस्तानी गोलंदाजांचं लक्ष्य हे दोघेच असतील. त्यांना तातडीने बाद करण्याचा प्रयत्न आमीर आणि वहाब रियाज करतील. मात्र रोहित-विराटने मोठी इनिंग खेळण्यावर लक्ष द्यावं, अस सचिनने सांगितले आहे.

दरम्यान पाकिस्तानचा महोम्मद अमीर हा बॉलर भारतासाठी घातक ठरेल असे सांगण्यात येत आहे. कारण इंग्लंडच्या लहरी वातावरणात आणि गवताळ पीचवर मोहम्मद अमीरची कामगिरी नेहमीचं उल्लेखनीय ठारली आहे. मोहम्मद आमीरने चाॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये देखील भारतीय संघाला आपल्या वेगवान गोलंदाजीने चांगलेच झोडपले होते. तर भारताच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना तंबूत पाठवण्यात त्याला यश मिळाले होते. परिमाणी भारताला हा सामना हरवा लागला होता. तर मोहम्मद आमीरने सध्या विश्वचषकात सर्वाधिक १० विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर केवळ ३० धावा देत आमीरने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!