टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध आहे, परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोगानुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले. राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या आई मीराबाई शिंदे या निर्णयानंतर भावून झाल्या आहेत. काकासाहेब समाजाच्या कामात कायम पुढं असायचा. त्यो असता तं गंज उड्या मारल्या असत्या. तेला कितिका आनंद झाला असता. असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता.
औरंगाबादेत २०१६ मध्ये निघालेल्या मराठा क्रांती मुक मोर्चापासून काकासाहेब प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हायचे. त्यानंतर सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच जुलै २०१८ मध्ये इशारा देऊन कायगाव टोका (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली. यानंतर मराठा समाजातील ४२ जणांनी जीवन संपवले होते. काकासाहेबांना जाऊन वर्ष व्हायच्या आतच राज्य सरकारने दिलेले आरक्षण वैध ठरल्याने जल्लोष होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

