Share

जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरी मराठा विद्यार्थ्यांना करता येणार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात अर्ज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवसायिक शाखेत प्रवेश घेताना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात अर्ज करता येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेतील अट आजपासून शिथिल करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांना उत्तर देताना विनोद तावडे बोलत होते.

या वेळी तावडे म्हणाले की,अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवसायिक शाखेत प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. तसेच ऑनलाईन प्रक्रियेतील अट आजपासून शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवसायिक शाखेत प्रवेश घेताना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात अर्ज करता येणार आहे.

दरम्यान,  जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्राऐवजी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती (टोकन) ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली होती.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!