Share

New Car Launch | Mahindra ची ‘ही’ कार होणार आज लाँच

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी Mahindra (महिंद्रा) आज तिची नवीन कार लॉन्च करणार आहे. महिंद्रा तिची हाय परफॉर्मन्स वर्जन Mahindra SUV XUV 300 Sportz आज म्हणजेच 7 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्च करणार आहे. ही कार हायब्रीड टेक्नॉलॉजी सह अनेक इंटरेस्टिंग फीचर्स सोबत सुसज्ज आहे.

महिंद्रा ने ही कार 2020 ऑटो एक्सपो मध्ये पहिल्यांदा सादर केली होती. अखेर आज ही कार लॉन्चिंग साठी पूर्णपणे तयार आहे. जून 2022 मध्ये या कारला ICAT ( इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी) प्रमाणपत्र मिळाले आहे.

Mahindra SUV XUV 300 Sportz लुक

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राची ही नवी कार ड्युअल-टोन कलर मध्ये असू शकते. ज्यामध्ये लाल रंगासह काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असू शकते. या नवीन SUV मध्ये कंपनीच्या नवीन लोगोसह नवीन एअर डॅम आणि कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रूफ देखील असू शकते.

Mahindra SUV XUV 300 Sportz इंजिन

या नवीन SUV मध्ये 1.2L थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल डायरेक्ट इंजेक्शन इंजिन असू शकते. जे 131hp ची मॅक्झिमम पावर आणि 230 न्यूटन मीटरचा टार्क निर्माण करू शकते. ही कार तीन प्रकारांमध्ये लाँच केली जाऊ शकते. ज्यामध्ये W6,W8 आणि W8 (0) असतील.

Mahindra SUV XUV 300 Sportz फिचर

महिंद्राच्या या नवीन SUV मध्ये पुश-बटन स्टार्ट-स्टॉप, 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, ऐपल कारप्ले और एंड्रॉयड ऑटो सपोर्ट, क्लाइमेट कंट्रोल आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या