Share

‘लकी’ चित्रपटाचे झाले फस्ट लूक पोस्टर लाँच, पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसणार क्लोथलेस !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : फिल्ममेकर संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच सोशल मीडियावरून रिलीज झाले. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निव्रस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे.

एम. एस. धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. ह्या पोस्टरबद्दल बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “मराठी तरूण आणि मराठी सिनेमा कात टाकतोय. आजच्या तरूणांवरचा सिनेमा असल्याने तुम्हांला असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजयदादा निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.”

फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हांला अशी अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील.”

अभिनेता अभय महाजन म्हणतो, “लकी ह्या तरूणाची ही एक मजेशीर कथा आहे. आणि ह्या सिनेमात मी अशा अनेक अनकन्वेशनल गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत. दादांच्या सिनेमाचा हिरो असणं ही खूप भारी गोष्ट आहे. आणि त्याहून भारी गोष्ट असते, ती म्हणजे त्या हिरोची ‘लक्षवेधी’ एन्ट्री ”

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!