Share

YouTube: यूट्यूब वर लवकरच लाईव्ह टीव्ही फिचर

Published On: 

सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी यू ट्युबने लाईव्ह टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. यू ट्युबने अमेरिकेतल्या मुख्य 4 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार केला असून, यात अमेरिकन प्रसारण नेटवर्कसह केबल चॅनेलवाल्यांचाही सहभाग आहे. पुढच्या महिन्यापासून अमेरिकेत लोकांना यू ट्युबवर लाईव्ह टीव्ही पाहता येणार आहे, असे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.
मात्र त्यासाठी ग्राहकांना महिन्याला 35 डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार आहेत, अशी माहिती यू ट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजसिस्की यांनी दिली आहे. यू ट्युब लाईव्ह व्हिडीओसाठी जवळपास 40 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात असून, त्यात व्हॉल्ट डिस्नी ईएसपीएनचाही समावेश आहे. यू ट्युब अमेरिकेतल्या डिश नेटवर्क स्लिंग टीव्ही, एटी अँड टीएस डायरेक टीव्ही आणि सोनी कॉर्प प्ले स्टेशनशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!