लातूर : लातूर महानगरपालिकेने फ्रंटलाईन वर्कर म्हणून शहरामधील ऑटोरिक्षा चालक, बँक कर्मचारी, मेडीकल दुकानदार, किराणा दुकानदार तसेच घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
कोरोनाच्या काळात तसेच लॉकडाऊन असतांना देखील शहरामधील ऑटोरिक्षा चालक, बँक कर्मचारी, मेडीकल दुकानदार, किराणा दुकानदार तसेच घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी यांचा जनसंपर्क अधिक येतो. त्यामुळे उपरोक्त व्यावसायिक व कर्मचारी यांचा दररोज अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. त्यामुळे व्यावसायिक व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करुन त्यांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करुन घेण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेने घेतलेला आहे.
शहरातील सर्व अॅटोरिक्षाचालक, वैद्यकीय कर्मचारी, मेडीकल, दुकानदार, किराणा दुकानदार तसेच वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी यांनी त्यांच्या संघटनेमार्फत प्रमाणित केलेले विहित नमुन्यातील फ्रंटलाईन वर्करचे प्रमाणपत्र सादर करुन मनपाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
याठिकाणी मिळेल लस :
१. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था
२. दयानंद कॉलेज, बार्शी रोड
३. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
४.विवेकानंद प्रा. विद्यामंदीर
५. यशवंत शाळा प्रा.ना केंद्र
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक, शाळांमध्ये आधार नोंदणीची सक्ती रद्द करण्याची मागणी
- पुण्यात आज कोरोना मृत्यूच्या आकडयात घट, तर ‘इतके’ नवे रुग्ण आढळले !
- चक्क आरोग्य केंद्रातच रंगायचा पार्ट्यांचा फड, औरंगाबाद पालिकेला खबरच नाही!
- परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर पालिकेची विशेष लसीकरण मोहिम!
- ‘विश्वासघात मूलमंत्र असलेले शिवसेनेवर विश्वास असल्याचं सांगतायत; त्यांनी खंजीर चिन्ह वापरावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
