टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खासदार आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच वाटप होत आहे, केंद्रीय सचिवालयाच्या कार्यालयातून याचं नियोजन केलं जातं.दिल्लीत २५ वर्ष आपले आजोबा ज्या बंगल्यात राहिले तोच बंगला आपल्याला द्यावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मने यांनी केली आहे, ‘२९ मीना बाग’ असे या बंगल्याचे नाव असून, तोचं बंगला मिळावा यासाठी धैर्यशील माने यांनी निवासस्थान वाटप समितीला तसा पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.
खा. धैर्यशील माने यांचे आजोबा कै बाळासाहेब माने हे सलग २५ वर्ष खासदार होते. १९७७ ते १९९१ अशा पाच टर्म मध्ये त्यांनी खासदारकी भूषवली. त्यांना दिल्लीत ‘२९ मीना बाग’ हा बंगला देण्यात आला होता. याच बंगल्यात खा. धैर्यशील माने याचं बालपण गेलं आहे. ते आपल्या आजोबांना आदर्श मानतात. खा.माने १०-१२ वर्षाचे असतांना ते या बंगल्याच्या आवारात खेळले आहेत. त्यांच्या या बंगल्यासोबत अनेक आठवणी असल्याने त्यांनी पत्राद्वारे हा बंगला मिळावा अशी मागणी केली आहे.
१७ व्या लोकसभेत ३०० खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्याचबरोबर तितक्याचं खासदारांना आता स्वतःचा बंगला खाली करावा लागणार आहे. ही घरे रिकामी होईपर्यंत नूतन खासदारांना आपआपल्या राज्यांच्या सदनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


