Share

जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती

Published On: 

टीम महारष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजप सरकारला धुळीत मिळविण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

या भेटीमध्ये जयंत पाटील आणि शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचार व समविचारी पक्षांशी निगडित रणनीतीबाबत चर्चा केली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीने राज्यात घवघवीत यश संपादन केले आहे. हे भाजप युतीचे यश पाहून कॉंग्रेस आघाडीला धडकी भरली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष आघाडी करून भाजप युतीला शह देण्याचा चंग बांधत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. तर अनेक नेते भाजप-सेनेमध्ये जाण्यासाठी गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!