Share

अनधिकृत बांधकामांवर जगनमोहन रेड्डींचा हातोडा; पहिलाच घाव चंद्राबाबूंच्या घरावर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू रहात असलेली प्रजा वेदिका ही इमारत पडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांचे पालन करत ही इमारत आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे अमरावतीमधील प्रजा वेदिका या इमारतीत राहात होते. टीडीपी सरकारने प्रजा वेदिका इमारतीची निर्मिती आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून करण्यात आले होती. परंतु ही इमारत नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आली होती, त्यामुळे या इमारतीला अवैध घोषित करत कारवाई करण्यात आली आहे.

याविषयी माहिती देताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, ‘प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जाईल अस विधान केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी ही इमारत विरोधीपक्ष नेत्याला द्यावी ही विनंती केली होती. मात्र सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली होती.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!