Share

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेलीच शिवसेना आहे का?

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पूज्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेलीच शिवसेना आहे का? असा प्रश्न आज आम्हाला पडतो आहे असं म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण चालवले आहेत. भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.

दिलासादायक : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के

“शिवसेनेने विधानसभेची निवडणूक भाजपासोबत लढली आणि सत्तेचा स्वार्थ त्यांना इतका महत्त्वाचा वाटला की त्यांनी आम्हाला धोका दिला. आम्ही धोका खाऊ शकतो पण कुणाला धोका देऊ शकत नाही. आजच्या घडीला शिवसेनेची अवस्था पाहिली की ही पूज्य बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आहे का? हा प्रश्न आम्हाला पडतो” असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, “जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे,” असं देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

‘शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे’, मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

महाराष्ट्र सरकार तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घणाघाती राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!