Share

IPL 2022: “छोटी बच्ची हो क्या?” डायलॉगवर शिखर धवन आणि प्रीती झिंटाचा भन्नाट वर्कआऊट; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंजाब किंग्ज (PBKS)चा सलामी फलंदाज शिखर धवन त्याच्या मैदानावर फटकेबाजीमुळे चर्चेत असतो. तर कधी तो सोशल मीडियावरील हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. शिखर कायमच इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असून विविध रिल्स बनवताना त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतो. तो इतर खेळाडूंसोबत अनेकदा रिल्स बनवताना दिसतो. दिल्लीच्या संघाकडून खेळत असताना पृथ्वी शॉ त्याचा रिल्स बनवण्यात खास साथी होता. पण यंदा दोघेही आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात असल्याने शिखर इतर खेळाडूंसोबत मजेशीर व्हिडीओ बनवत आहे. आता तर शिखरने थेट पंजाब संघाची सहमालक असणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटासोबत जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय.

शिखरने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन आणि प्रीती झिंटा दोघेही जिममध्ये वर्कआऊट करत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला हिरोपंती चित्रपटातील टायगर श्रॉफचा एक डायलॉग ऐकू येत आहे. हा डायलॉग म्हणजे ‘छोटी बच्ची हो क्या?’हा असून या डायलॉगवर सोशल मिडियावर अनेक मीम्स बनवले जात आहेत. आता हाच डायलॉग व्हिडीओला लावत शिखरने पोस्ट केला आहे.

 

शिखर धवनची दमदार कामगिरी
पंजाब किंग्जचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यात ४२.३३ च्या सरासरीने ३८१ धावा ठोकल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांना मिळणाऱ्या ऑरेंज कॅपच्या लढतीत तो चौथ्या नंबरवर आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात तीन अर्धशतकं झळकावली आहेत.

प्लेऑफच्या शर्यतीत पंजाबही दावेदार
आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये पंजाब किंग्जने आतापर्यंत ११ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेतआठव्या क्रमांकावर आहेत. शिल्लक असलेले तीनही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजूनही आहे. परंतु त्यांना उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तर इतर संघांच्या कामगिरीवरही पंजाब संघ नजर ठेवून असेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!