Share

IPL 2022 RR vs CSK : मुंबईत महेंद्रसिंह धोनीनं जिंकला टॉस; ‘धाकड’ खेळाडूचं राजस्थान संघात कमबॅक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR vs CSK) यांच्यात हंगामातील ६८वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने शिवम दुबेऐवजी अंबाती रायुडूला संधी दिली आहे. राजस्थानमध्ये हेटमायरचे पुनरागमन झाले आहे. राजस्थानचा संघ १३ पैकी आठ सामने जिंकून प्लेऑफमध्ये जवळपास पोहोचला आहे पण संघाला हा सामना जिंकून टॉप २ मध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याचवेळी, चेन्नई आधीच स्पर्धेबाहेर आहे आणि संघ अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून हंगाम संपवण्याचा प्रयत्न करेल.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने चांगली कामगिरी केली असून संघाला आपला वेग कायम ठेवायचा आहे. शिमरॉन हेटमायर देखील या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी परतला आहे, मात्र, आघाडीच्या फळीतील जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांना गेल्या काही सामन्यांत चांगली सुरुवात करता आलेली नाही. त्याचबरोबर कर्णधार संजू सॅमसनलाही मोठी खेळी करता आलेली नाही. अर्थात संघाला यात सुधारणा करायला आवडेल. त्याचबरोबर गोलंदाजीतही संघ अतिशय संतुलित आहे.

गेल्या मोसमात विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यावेळी त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी एकसंध नव्हती. त्यामुळेच चेन्नईने १३ सामन्यांत केवळ चार सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २५ सामने झाले असून यादरम्यान चेन्नईने १५ आणि राजस्थानने १० सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची Playing 11 

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू, एन. जगदीसन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!