Share

IPL 2022 KKR vs SRH : श्रेयस अय्यरनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा 61वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात खेळवला जाणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कोलकाताचा कॅप्टन श्रेयश अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  आयपीएल (IPL)च्या यंदाच्या हंगामात कोलकाताने १२ सामन्यांत ५ मध्ये विजय मिळवला असून त्यांचे गुणतालिकेत १० अंक आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता संघ सर्वात खाली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोलकाताच्या संघाला त्याच्या पुढील दोन्ही सामन्यात मोठा विजय मिळवणे गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, हे दोन्ही सामने जिंकल्यानंतरही कोलकाताला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच हैदराबादला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यसाठी पुढील तीन सामने जिंकावे लागतील. जरी हैदराबादनं एखादा सामना गमावला तरीही त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. परंतु, त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार.

या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या २२ सामन्यांमध्ये १४ वेळा कोलकाताने तर ८ वेळा हैदराबादने बाजी मारली आहे

दोन्ही संघांची प्लेइंग 11

हैदराबाद – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंह, मार्को जेन्सन,  भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन,

कोलकाता – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव,  सुनील नरेन, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती,

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!