Share

IND vs NED T20 World Cup | भारताला पहिला झटका! केएल राहुल बाद

Published On: 

🕒 1 min read

IND vs NED T20 World Cup | सिडनीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दोन षटकात कोणतेही नुकसान न करता 10 धावा केल्या. तिसऱ्या षटकात केएल राहुलला बाद करून वैनने संघाला मोठे यश मिळवून दिले. केएल राहुल फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होता पण चुकला. चेंडू पॅडला लागला आणि राहुल एलबीडब्ल्यू झाला. त्याला 12 चेंडूत केवळ 9 धावा करता आल्या.

जेव्हा-जेव्हा भारतीय संघाने विश्वचषकात नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. 2011 मध्ये भारताने विजेतेपद आपल्या हातात घेतले होते, तर 2003 मध्ये ते उपविजेते होते.

दोन्ही संघाचे खेळाडू- 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि दीपक हुडा.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (c&wk), मॅक्स ओ’ डाऊड, विक्रमजीत सिंग, बास डी लीड, टॉम कूपर, कॉलिन एकरमन, टिम प्रिंगल, लोगान वैन बीक, टिम गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल वैन मीकरेन, शरीझ अहमद, वैन डर मर्व्ह, ब्रँडन ग्लोव्हर आणि स्टीफ मायबर्ग.

कुठे पाहता येईल सामना-

भारत आणि नेदरलँड्स T20 विश्वचषक सुपर 12 सामने डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहता येतील. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील T20 विश्वचषक सुपर 12 सामन्याचे थेट प्रक्षेपण (भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!