Share

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव,आणखी 84 रेल्वे गाड्या रद्द

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात आणखी 84 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 20 ते 31 मार्च या काळात या गाड्या धावणार नाहीत. त्यामुळे देशभरात रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांची संख्या आता 155 झाली आहे.

तर इकडे राज्यातली रेल्वे, एसटी बस, खासगी बस, मेट्रो या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या फेऱ्या निम्म्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह इतर मार्गदर्शक तत्त्वांवर भर द्यावा अशी सुचना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत त्यांनी काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर जाऊन त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली आणि सूचना केल्या.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!