Share

पुण्यासह ‘या’ शहरातील लॉकडाऊन वाढवला, वाचा काय काय असेल बंद

Published On: 

ठाणे : कोरोनाचा कहर राज्यात वाढत असून अनेक शहरांसह काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २ जुलै ते १२ जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, आता वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता सुरु असलेला लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. ठाण्यात आता रविवार 19 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ठाण्यात लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीत घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

वाचा ठाण्यात काय सुरु असेल व काय बंद, ठाण्यात काय सुरु, काय बंद?

१) आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

२)इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही .

३) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.

४)सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

५) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.

६) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.तसेच, पुणे- पिंपरी-चिंचवड १३ जुलै ते २४ जुलै, ठाणे- १३ ते १९ जुलै आणि नांदेड येथे १२ जुलै आठवडाभर लॉकडाऊन असेल.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!