मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा शिरकाव वाढतच चालला आहे. चिंताजनक बाब म्हणजे काल दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत २ हजारांची भर पडली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. एकाच दिसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तर चिंतेत वाढ होणारी बाब म्हणजे राज्यात सलग पाचव्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येत 2 हजारांची भर पडली. राज्यात काल 2 हजार 345 बाधित आढळले. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 41 हजारांपुढे गेली आहे.
तसेच 17 मे राज्यात 2 हजार 347 बाधित आढळले. राज्याचा तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. राज्यातील करोनाबाधितांमध्ये अवघ्या 5 दिवसांत 10 हजारांहून अधिक संख्येची भर पडली आहे.
दरम्यान, जगभरात आतापर्यंत 51 लाख 33 हजार 101 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. तर 20 लाख 46 हजार 412 लोक बरे झाले आहेत. मृतांचा आकडा 3 लाख 31 हजार 186वर पोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !
लढाई जिंकणार : कोरोना बरे झालेल्यांची विक्रमी संख्या; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले
गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय

