Share

भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा,अंतराळात इस्रो उभारणार स्वतंत्र स्पेस स्टेशन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : इस्रो अवकाश संशोधनामध्ये नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करत आले आहे. त्यामुळे आता इस्रो अवकाशात स्वतंत्र स्पेस स्टेशन उभारत अवकाश संशोधनामध्ये गरुड झेप घेणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

याबाबत सिवन म्हणाले की, हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल. अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करत आहे.

दरम्यान त्याचबरोबर चांद्रायन-२ नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!