Share

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी आज महत्त्वाची बैठक

Published On: 

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी रविवारी (ता. १ ) महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन झाली होती.

ही समिती आज (ता. 29) सकाळी 10.30 वाजता ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉइंट, मुंबई येथे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेणार आहेत. याप्रसंगी राज्य सरकारच्या विधी, सामान्य प्रशासन व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहतील. या बैठकीत येत्या 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीसंदर्भात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील इतर बाबींची देखील यावेळी चर्चा होईल.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असलेल्या याचिकेवर १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!