Share

बर्ड फ्लूचा परिणाम, कोंबड्यांच्या मागणीत घट; मिळेल त्या दरात विक्रीवर भर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याच्या चर्चेने मागील दोन दिवसांत कोंबड्यांच्या मागणीतही घट होत असून कोरोनापाठोपाठ हे दुसरे संकट ओढवण्याच्या शक्यतेने कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये व्यवसायात नुकसान सोसण्याची भिती पसरली आहे.

कोरोनाच्या काळात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात खरेदीदार ते खाणारे ही साखळीच तुटली होती. परिणामी मांसाहार करणाऱ्यांकडून कोंबड्या, चिकनची मागणी एकदम घटली. कोरोनाकाळात अक्षरश खड्डा करून कोंबड्यांना पुरावे लागले होते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कोरोना काळात चिकनचा दरही २० ते ३० रुपये किलोपर्यंत घसरलेला होता. परिणामत व्यवसायावर पाणी फेरले गेले होते.

ऑगस्टनंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना कोरोनाची भीतीही काहीसी ओसरत गेली. चिकनची खरेदीही वाढू लागली. दरही पूर्ववत होऊ लागले. आता किरकोळ बाजारात दीडशे ते २०० रुपये किलोने चिकनचा दर आहे. तर कोंबडी पालन करणाऱ्या व्यावसायिकांकडून गावरान कोंबडी १३० ते १४० रुपये किलोपर्यंत खरेदी केली जाते. बॉयलर कोंबडी ८० ते ९० रुपये किलोपर्यंत मिळत असताना बर्ड फ्लूची चर्चा सुरू झालेली आहे.

महाराष्ट्रात परभणीत शुक्रवारी ८०० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. नगरमध्येही असाच एक प्रकार घडल्याचे ऐकण्यात येत आहे. इतरही राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूच्या अनुषंगाने वृत्त पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत मागणीत घट होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लहान-मोठे मिळून एक हजारच्या जवळपास कोंबडय़ांचे पालन करणारे शेतकरी, व्यावसायिक आहेत. आपल्याकडे करोनाकाळात ६ ते ७ टन माल होता. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सद्याच्या स्थितीत साधारण २ ते अडीच टन माल जोपासलेला आहे. त्यावर २ ते ३ लाख खर्च झालेला आहे. चिकन विक्रीतील पारंपरिक व्यावसायिकांकडून मागणी कमी झालेली नसली तरी अन्य खरेदीदारांनी ५०० कोंबड्या विकत घेण्याची दर्शवलेली तयारी सध्या तरी थांबवलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!