Share

Rose water benefits | चेहऱ्यावरील समस्या कमी करायच्या असेल तर ‘या’ पद्धतीने लावा गुलाबजल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी संपताच देशांमध्ये सर्वत्र थंडी (Cold) ची चाहूल लागली आहे. त्यामुळे हिवाळा (Winter) येताच आपल्याला त्वचा (Skin) च्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्वचा कोरडी होणे किंवा त्वचेला भेगा पडल्याने इत्यादी समस्यांना हिवाळ्यामध्ये तोंड द्यावे लागते. त्यामुळे हिवाळा सुरू होताच आपल्याला सर्वाधिक आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टसचा वापर करतो. पण ते केमिकल युक्त प्रोडक्ट्स बऱ्याच वेळा आपल्या चेहऱ्याला आणि त्वचेला हानी पोहोचू शकतात. पण या केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर टाळून तुम्ही फक्त गुलाबजल (Rose water) वापरून हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेऊ शकता. हिवाळ्यामध्ये गुलाबजल कसे चेहऱ्यावर लावायचे याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती सांगणार आहे.

हिवाळ्यात गुलाबजल (Rose water) चे मिळू शकतात हे फायदे

चेहऱ्याला क्लीन करण्यासाठी गुलाबजल (Rose water) चा वापर करावा

हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबजल अनेक प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही ते क्लिनर म्हणून वापरू शकता. या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही जेव्हाही बाहेरून याल, तेव्हा तुम्ही घरी येताच कापसाचा बोळा गुलाबजल मध्ये बुडवून त्याने संपूर्ण चेहरा साफ करून घ्या. असे केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण साफ होऊन त्वचा निरोगी राहील. त्याचबरोबर गुलाबजल हे आयुर्वेदिक असल्याने त्याचे कोणतेही चेहऱ्याला दुष्परिणाम होत नाही.

त्वचेला टोन करण्यासाठी गुलाब जल चा वापर करता येऊ शकतो

या कडाक्याच्या थंडीमध्ये तुमच्या त्वचेला टोन करण्यासाठी तुम्ही गुलाबजलचा वापर करू शकता. त्याचबरोबर नियमित गुलाबजलचा वापर केल्याने त्याच्या हायड्रेट राहते.

हिवाळ्यामध्ये क्रीम ऐवजी चेहऱ्यावर गुलाबजाम लावा

हिवाळा सुरू होताच आपण वेगवेगळ्या क्रीम आपल्या चेहऱ्यावर ट्राय करतो. एक वेळा या क्रीमचे आपल्या चेहऱ्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या थंडीमध्ये तुम्ही क्रीमचा वापर टाळून गुलाबजल चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होऊन चेहराचा ओलावा टिकून राहील.

गुलाब जल मेकअप रिमूवर म्हणून देखील काम करू शकते

हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही जाड मेकअप कराल तेव्हा तुम्ही गुलाबजलच्या मदतीने तो मेकअप काढू शकता. गुलाबजलने मेकअप काढल्यास तुम्हाला दोन फायदे मिळू शकतात. पहिला म्हणजे तुमचा मेकअप व्यवस्थित निघेल आणि दुसरा चेहऱ्यावरील घाण बाहेर पडेल.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!