नागपूर – नागपूर महापालिकेच्या 20 जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, दुसरीकडे सभा घेण्यावर महापौर संदीप जोशी ठाम आहेत. या मुद्यावर सत्ताधारी भाजपविरुद्ध आयुक्त असा वाद पुन्हा पेटला आहे.
राज्यात आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असा दावा महापौरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला.
नागपूरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. सध्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा अकराशेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यात महानगरपालिका प्रशासनाचं अपयश आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहे’ असा आरोप करत नागपूरच्या महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निशाना साधलाय.
क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा आरोप संदीप जोशी यांनी केला. यावेळी त्यांनी आमचं सरकार असतं, तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असंही म्हटलं आहे.भाजपला तुकाराम मुंढेंच्या बदलीत स्वारस्य नाही. ज्यांनी मुंढेंना आणलं तेच याचा परिणाम भोगत आहेत. आमचं सरकार असतं, तर मुंढे नागपुरात आलेच नसते.’

