Share

जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला आणि सरकारला दिला आहे. सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) नवी मुंबईतील तुर्भे येथील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. दरम्यान, याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक झाली असून सोमवारी सकाळी ११ वाजता मनसेने खळखट्याक आंदोलन केले. या आंदोलनाला मनसेने ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे म्हटले आहे. तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का? 

मराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा

धक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!