Share

जिओ फोन बुक करायचाय?

Published On: 

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त फीचर फोन (दि. 24 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बुकिंग जरी आज होणार असली तरी ग्राहकांच्या हातात हा फोन सप्टेंबर महिन्यात पडणार आहे. जो अगोदर बुक करेल, त्यालाच अगोदर हा फोन मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच फोन बुक करण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
  • ऑनलाईन बुकिंग: हा फोन आपण Myjio अ‍‍ॅपवर बुक करू शकता. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन Sign Up करू शकता. त्यानंतर KEEP ME POSTED वर क्लिक करून तिथे मागितलेली आवश्यक माहिती भरा.
  •  ऑफलाईन प्री बुकींग : आपल्या जवळच्या जिओ रिटेलरकडे जा. त्यांना आपण आपल्या आधारकार्डची एक फोटो देऊन बुकिंग करू शकता.
जिओच्या 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येणार आहे, हा त्याचा सर्वात मोठा फायदा असेल. तुम्ही सतत इंटरनेट वापरत नसाल, तरीही तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. जिओ फोन हा 0 रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये 3 वर्षांनी परत मिळतील.
जिओ फोन बुक करण्यासाठी ग्राहकाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. आधार कार्डची फोटो कॉपी जवळच्या अधिकृत जिओ फोन विक्रेत्याला द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर असे करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!