Share

प्लंबिंग कामे करून लेकीचे स्वप्न साकारण्यास मदत; अवंतिका नराळेची सोनेरी धाव

Published On: 

पुणे : खरंतर कबड्डीमध्ये करिअर करण्याचे ठरविलेल्या अवंतिका नराळे हिने हा निर्णय बदलून अ‍ॅथलेटिक्सचे करिअर निवडले. हा निर्णय सार्थ ठरवित तिने येथे सतरा वषार्खालील गटात दोनशे मीटर्स धावण्याची शर्यत जिंकली. महाराष्ट्राच्या दिनेश सिंग याने २१ वषार्खालील गटाच्या दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यत जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली. अक्षय गोवर्धन याने मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाच्या उपस्थितीत अवंतिका हिने दोनशे मीटर्सचे अंतर २४.४७ सेकंदात पार केले. तेलंगणाची जीवनजी दीप्ती (२५.२६ सेकंद) व उत्तरप्रदेशच्या  (२५.४८ सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले.

अवंतिका हिने दोन वेळा दोनशे मीटर्स शर्यतीत कुमार गटातील राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना तिने आंतरराष्ट्रीय खेळाडू दुती चंद हिचा विक्रम मोडला होता आणि नंतर तिने पुन्हा आपलाच विक्रम मागे टाकला. गतवर्षी तिने नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान मिळविला होता. अवंतिका ही संजय पाटणकर आणि सुधाकर मेमाणे यांच्याकडे मार्गदर्शन घेते.

अवंतिकाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, तिचे आई-वडील पोटाला चिमटा काढून लेकीचे स्वप्न साकारण्यास मदत करतात. वडिल संतोष नराळे प्लंबिंगची कामे करतात आणि त्यावरच त्यांचे घर चालते. आपल्या कुटुंबाची ही परिस्थिती बदलण्याची इच्छा तिने या वेळी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या आशिवार्दामुळेच मी या यशापर्यंत पोहोचले आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये  समृद्ध करिअर करण्याचे माझे ध्येय आहे असे अवंतिका हिने सांगितले.

अवंतिकाने लोणकर प्रशालेतील आपल्या शिक्षकांचेही आभार मानले. ती म्हणाली, शाळेतील क्रीडा शिक्षक शिवाजी म्हेत्रे यांनी मला धावण्याची गळ घातली आणि शाळेसाठी पहिल्याच स्पर्धेत बुटाशिवाय धावतानाही मी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून शाळेने देखील मला सतत सहकार्य केले आहे. सराव आणि स्पर्धा सहभाग यामुळे शाळेतील उपस्थितीवर त्याचा परिणाम व्हायचा. मात्र, शाळेने मला याबाबत स्वातंत्र्य दिले. त्यामुळे मी खेळाबरोबर शिक्षणही घेऊ शकले आहे.

१७ वषार्खालील गटात मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अक्षय गोवर्धन याचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. त्याने हे अंतर २२.१३ सेकंदात पार केले. आंध्रप्रदेशचा श्रीनिवास षणमुगम (२१.९२ सेकंद) व दिल्लीचा अंशुलकुमार (२१.९३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!